| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा पोलिसांनी नशामुक्त म्हसळा ही मोहीम हाती घेतली असून त्या मोहिमे अंतर्गत गांजा विक्री करणार्या दोन, तर गांजाचे सेवन करणार्या 2 युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
म्हसळा शहरात काही तरुण हे अमली पदार्थ व्यसनाच्या आधीन गेले असल्याची तक्रार पोलिसांना ग्रामस्थानी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने म्हसळा पोलिसांनी तत्परता दाखवत शहरात गांजा विकणार्या 2 तरुणांना, तर गांज्याचे सेवन करणार्या 2 तरुणांना अशा एकूण चार तरुणांना रंगे हात पकडून त्यांच्या कडून 76650 रुपयांचा मुद्देमाल जप्त कारण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर म्हसळा तालुक्यात शांतता नांदत आहे. यातच आता अमली पदार्थ विरोधात होत असलेली कारवाई पाहून नक्कीच म्हसळा नशा मुक्त होणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या कारवाईमध्ये उपपोलीस निरीक्षक डि. व्ही. एडवळे व त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.