| पनवेल | वार्ताहर |
खारघरमधील स्पॅगेटी सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. तसेच, खारघरमधील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
एप्रिलमध्ये तळोजातील आसावरी सोसायटीमधील आद्या सिंग या चारवर्षीय बालकाला, तर मेमध्ये खारघर सेक्टर 10 मध्ये सायकलिंगसाठी जाणाऱ्या रंजीत जोगी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या घटना ताज्या असतानाच नुकतेच सकाळच्या सुमारास स्पॅगेटीतील पारिजात सोसायटीतील सफाई कामगार असलेल्या महिलेवर एक कुत्रा धावून गेला. यावेळी त्या महिलेने आरडाओरड केल्याने त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे सुरक्षा रक्षक नौशाद आलम महिलेच्या मदतीसाठी गेले. त्यामुळे कुत्र्याने नौशाद आलम यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या चेहरा व पायाला चावा घेतला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.