| अलिबाग | प्रतिनिधी |
कोकण एज्यूकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा ॲड. नंदा देशमुख यांचे गुरुवारी (दि.24) पहाटे एकच्या सुमारास निधन झाले. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अलिबागमध्ये पारस बंगला, विद्यानगर येथे दुपार दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. श्रीबागमधील वैकुंठ स्माशनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ॲड. नंदा देशमुख यांनी गेली 12 वर्षे कोएसोच्या उपाध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. याशिवाय वकिली क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, सदस्या चित्रा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शोक व्यक्त केला.
ॲड. नंदा देशमुख गेली 12 वर्षे कोएसोच्या उपाध्यक्षपदी होत्या. वकिली क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. त्यांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का लागला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच इच्छा.
पंडीत पाटील, माजी आमदार