| पनवेल | वार्ताहर |
कामोठे सेक्टर 8 येथील पाण्याच्या टाकी समोर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. तसेच या खड्ड्याच्या आजूबाजूच्या रस्त्यावरसुद्धा मोठ मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर पूर्ण चिखल झालेला आहे. पोलीस ठाणे ते ऐश्वर्या हॉटेल या मुख्य रहदारीचा रस्ता असून, खड्ड्यांमुळे अणि चिखलामुळे अनेक दुचाकीस्वरांचा घसरून अपघात झाला आहे. पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनदेखील कार्यवाही होत नसल्याने कामोठे फोरमच्या महिला टीमद्वारे वतीने पालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले.
सिडको आणि पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कामोठे कॉलोनी फोरमच्या महिला टीमद्वारे पालिकेविरोधात शहरातील खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, रस्त्यावरील खड्डे कसे गोल गोल, पैशाचा झाला झोल झोल, इकडे तिकडे चोहीकडे, खड्डेच खड्डे सगळीकडे, पालिका प्रशासन दमदार, खड्डा शानदार अशा घोषनांचे फलक पकडत सेक्टर 8 येथील सिडकोच्या जलकुंभासमोर पालिकेविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये रंजना सडोलीकर, शुभांगी खरात, शीतल दिनकर, सुप्रिया माने, उषाकिरण शिंगे, संजीवनी तोत्रे, मुक्ता घुगे, सुनीता निर्मळ, मधुरा घाग, स्मिता गायकवाड, छाया कांबळे, अरुणा भेके तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.