| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि पाकिस्तान तणावामुळे देशभरातील 32 हून अधिक विमानतळांवरील उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. 15 तारखेपर्यंत ही उड्डाणं बंद राहतील, असं भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या निर्णयात बदल करण्यात आला असून, सर्व विमानतळ पुन्हा नागरी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर 9 राज्यांमधील 32 विमानतळं तत्काळ उघडण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली. दि. 9 ते 15 मे या कालावधीत देशातील 32 विमानतळं बंद ठेवण्यात आली होती. मात्र, शस्त्रसंधी झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला असून, सोमवार, दि. 12 मेपासून विमानतळं सेवा सुरू करण्यात आली आहे.