मनवि सेना पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे दौर्‍यावर

। माणगाव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपला महासंपर्क अभियान सर्वत्र सुरु केला असून कोकणात त्यांचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले.माणगावात त्यांचे शनिवारी.9 जुलै रोजी दुपारी आगमन होताच मनसेतर्फे त्यांचे माणगाव नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांनी मनवि सेना पुनर्बांधणी दौर्‍यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
अमित ठाकरे यांचे माणगावात शनिवारी आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी यांचे स्वागत केले.कुणबी भवन माणगाव याठिकाणी अमित ठाकरे यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांशी व नंतर मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी यश सरदेसाई,प्रशांत कनोजिया देवेंद्र गायकवाड, दिलीप सांगले, अमोल पेणकर, सुबोध जाधव, चेतन उतेकर, प्रवीण शिंदे, प्रतिक रहाटे,प्रदीप फुलारे, रुपेश सकपाळ,रोहा महिला तालुकाध्यक्ष दिपश्री घासे, मंगेश रावकर, दीपक चव्हाण, साईनाथ धुळे, गोपाळ पवार, ऋषभ वातेरे, ओमकार मोहीरे, अमोल पवार महेश सावडेकर आदींसह मनसे व मनवि सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version