| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पदाचा गैरवापर करुन सिडकोचा भूखंड पत्नीच्या नावावर केल्यासंदर्भात केवळ भुखंड वाटप रद्द करुन चालणार नाही तर या संदर्भात चौकशी करुन आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात तात्काळ योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे. राज्यभर उठसूठ याच्या त्याच्यावर भ्रष्टाचाराचे फुसके बार काढणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आता या प्रकरणासंदर्भात सीबीडी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार आहेत याची आम्ही वाट पहात आहोत. इतरांवर आरोप करणारेच जर भ्रष्टाचारात नखशिखांत बुडाले असतील तर त्यांना दुसर्यांकडे बोट करण्याचा नैतीक अधिकार काय असा सवालही त्यांनी केला आहे.