। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील मुंबई – पुणे महामार्ग रस्त्यालगत बिंदास बारच्या पुढे नवीन मेरिको इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 93 लोखंडी बॅरीगेट्स ज्याची किंमत जवळपास दोन लाख 32 हजार 500 रुपये किमतीचे चोरल्याप्रकरणी दोघाजणांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. नवीन मेरिको इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुंबई -पुणे महामार्गावर दुरुस्तीचे कळंबोली सर्कल ते खालापूर टोलनाका पर्यंत कामाच्या ठिकाणाहून दोन लाख 32 हजार 500 रुपये किमतीचे एकूण 93 लोखंडी बॅरीगेट्स चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, विजय देवरे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे टेम्पो चालक भारत वानखडे (वय 33) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,32,500 किमतीचे 53 लोखंडी बॅरीगेट्स जप्त करण्यात आले आहे.