झेप फाऊंडेशनचा उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
झेप फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण एक अभियान अंतर्गत मंगळवार दि. 8 मार्च रोजी स्व. सुलभाकाकू पाटील श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्मृतिगंध एक श्रद्धांजली आणि सुलभा पाटील महिला गुणगौरव सोहळा होणार आहे. अलिबाग वडखळ रोडवरील पांडवादेवी येथील जय मंगल हॉल येथे होणार्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अलिबागच्या माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, महाराष्ट्र राज्याच्या शेकाप महिला आघाडी प्रमुख आशाताई शिंदे, माजी मंत्री मीनाक्षी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन झेप फाऊंडेशन आणि पाटील परिवाराच्या वतीने चित्रा पाटील यांनी केले आहे.