| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाळा समाधानकारक झाल्याने रायगडच्या उजाड धरतीने जणू हिरवा शालू परिधान केल्याचा भास होत आहे. शेतामध्ये भात लागवड झाल्यामुळे जणू सर्वत्र ठिकाणी हिरवाई निर्माण झाली आहे. यामुळे गुरांच्या चार्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. भात लागवड होऊन एक महिना निघून गेला आहे. यामुळे शेती बहरली; पण दाणेरहित असेच दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. या वर्षी पाऊसाचे आगमन वेळेवर झाले नाही यामुळे भात लागवडीची कामे वेळेवर झाली नाही. मात्र पावसाने थैमान घातल्यामुळे तोंडाच्या घासावर अनेक शेतकरी वर्गांचे पाणी फिरले आहे. असे असले तरी सुद्धा काही शेतकरी वर्गांची शेती या पावसात टिकून राहिली. सध्या शेतातील भात लागवडमुळे सर्वत्र ठिकाणी हिरवळ निर्माण झाली. एकेकाळी अंगारा उधळणारी सृष्टी आज जणू सुवासिक पुलांच्या वासाने दरवळत आहे. असल्याचा भास निर्माण होत आहे. शेताच्या बांधावर, माळरानावर मोठ्या प्रमाणावर गवत रुजले आहे. त्यामुळे गुरांना खाद्य चांगल्या प्रमाणात मिळत आहे.
पावसाच्या आगमनाने शेतजमिनी एकदम हिरव्यागार दिसू लागली आहे. शेती साधारण वर्गातील लोकांची असल्याने त्यांना सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात योजना मिळत असतात. त्यातच शेतीला कुंपणाच्या समस्येमुळे पाहिजे त्या प्रमाणात लागवडीखाली आणता येत नाहीत. पूर्वी सर्व शेती लागवडीखाली येत त्यामुळे कुंपणाची तरतूद शेतकर्यांकडून होत असे. मात्र आज मोकाट गुरांचे अतिक्रमण, पावसाचे तांडव, भात पिकाला खोड किड्यांचा प्रादुर्भाव यामूळे आताच्या काळात बहुतेक शेतकरी भात शेती कडे पाठ फिरवत आहे. मात्र असे असले तरी सुद्धा ग्रामीण भागतील भात लागवड केलेली शेती हिरवीगार झाली असून दाणे विरहीत पाहावयास मिळत आहे.