ऑगस्ट महिन्यात रुग्ण संख्या वाढली, पालिका प्रशासन सज्ज
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सावधान,पनवेलकरांनो,शहरात डेंग्यू,मलेरियाचा फैलाव वाढतोय, ऑगस्ट महिन्यात रुग्ण संख्येत वाढ झाल्याने पालिका प्रशासनही सज्ज झालेले आहे.नागरिकांनीही योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेेले आहे. पनवेल पालिका हद्दीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिण्यात डेंग्यू च्या 241 रुग्णांची नोंद झाली असून,मलेरियाच्या 67 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात वातावरणात होत असलेल्या बदला मुळे साथीचे आजार बळवण्याची शक्यता असते. अशा वेळी साथीच्या आजाराची लागण होऊ नये या करता काळजी घेणे गरजेचे असते. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देखील या करता विशेष मोहीम राबवली जात असून, साथीचे आजार पसरवण्यास जवाबदार डासांची पैदास रोखण्यासाठी वेळोवेळी धूर फवारणी करत नागरिकांमध्ये मध्ये जनजागृती केली जात आहे.
पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार जुलै महिण्यात पालिका हद्दीत डेंग्युच्या 115 रुग्णांची नोंद झाली आहे. या पैकी 108 रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळून आले आहेत.तर पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 रुग्णांची नोंद झाली आहे.ऑगस्ट महिन्यात डेंग्यू च्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून खाजगी रुग्णालयात 103 तर पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 23 अशा 126 रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
1) साथीचा फैलाव ऑगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात मलेरियाच्या 25 रुग्णांनची नोंद झाली होती तर ऑगस्ट महिन्यात यात वाढ होऊन रुग्ण संख्या 42 वर गेली आहे.
2) प्रशासनाने कंबर कसली
साथ रोग नियंत्रणासाठी पालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग सज्ज असून 10 प्रथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत 95 कर्मचाऱ्यांच्या टीम सोबत 8 एमपीडब्ल्यू 4 एचआईटी ची टीम नागरिकांमध्ये साथ रोग नियंत्रणसाठी जनजागृती तसेच चाचण्या करण्याचे काम करत आहे.
3) 25 हजार चाचण्या.
जानेवारी ते ऑगस्ट महिन्या दरम्यान पालिकेच्या माध्यमातून 25 हजार 989 मलेरियाच्या चाचण्या करण्यात आल्या ज्या मध्ये 67 रुग्ण पॉसिटीव्ह आले तर डेंग्यू च्या 149 चाचण्यामध्ये 34 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
साथ रोग नियंत्रणासाठी पालिका प्रशासन सर्वोतोपरी सज्ज आहे. आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याने त्याचा फायदा देखील होत आहे.
सचिन पवार, उपायुक्त. पनवेल
नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या महापालिकेमध्ये प्रशासन सर्व यंत्रणा सांभाळते.अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी उणीव जाणवते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासाबद्दल आपण अगोदरच नियोजन केले तर नक्कीच पनवेल मध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढणार नाही. आयुक्तांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलावी अशा प्रकारे मी मागणी केली आहे आणि पाठपुरावाही करत आहे.
प्रितम जनार्दन म्हात्रे (मा. विरोधी पक्षनेता, प. म. पा.)