| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा हद्दीतील आंबिवलीतर्फे तुंगारतन येथे कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश नथू कांबळे (36) यांच्या घरासमोर उभे असताना आरोपी प्रफुल्ल भगवान सोनावळे (32) याने घरासमोर जाऊन वहिनीला शिवीगाळ का करतो, असे विचारले. दरम्यान, निलेशची वहिनी काहीही बोलली नाही असे समजावत असताना प्रफुल्ल सोनावळे यास निलेश कांबळे याचा राग येऊन शिवीगाळ करून व तिथेच पडलेला दांडका तक्रारदाराच्या डोक्यात मारला. या मारहाणीत हाताच्या दंडावर, पायावर दुखापती केल्या असून, तक्रार यांचा जबाब नोंदवून त्यास ग्रामीण रूग्णालय चौक येथे दाखल करण्यात आले. आरोपी प्रफुल्ल सोनावळे याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा पाटील अधिक तपास करीत आहेत.