प्रधान महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट स्वंयसेवक पुरस्कार

। नागोठणे । वार्ताहर ।
कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयास 2019-20 या शैक्षणिक वर्षाचा विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वंयसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णाली घरट हिला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, एन.एस.एस समन्वयक प्रा. सुधीर पुराणिक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तिला प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, कार्यक्रम अधिकारी, शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version