| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीवरून तोल जाऊन पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या गणेशनगरमध्ये घडली आहे. पतंग उडतवाना इमारतीच्या गच्चीवरून पडून आठ वर्षीय मुलाचा झाल्याची घटना सोमवारी (दि.20) घडली आहे.
नाशिक शहरात पतंग उडवताना इमारतीच्या गच्चीवरून पडून आठ वर्षीय मुलाचा झाल्याची घटना घडली आहे. नक्ष संदीप बनकर असे मृत्यू मुलाचे नाव आहे. नाशिकच्या गणेशनगर काठे गल्ली येथे ही घटना घडली आहे. नक्ष हा रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.