| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल सेक्टर एक येथील एक बंगल्यात एका अज्ञात इसमाने प्रवेश करून घरात घरफोडी करून 67 हजार 500 रुपयांचे दागिने आणि 60 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सृष्टी बांगला येथे राहणारे अमोल प्रभाकर उरणकर हे आपल्या परिवारासह पोलादपूर येथे घरातील एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून 67 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि 60 हजार रुपये चोरून नेले. दरम्यान, अमोल उरणकर हे घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.