मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या लांबच लांब रांगा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कारला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. यामुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली असून तब्बल १० किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली जवळ पुणे लेन वर ही दुर्घटना घडली असून या घटनेत महेंद्रा XUV कार जळून खाक झाली. अग्नी शमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे महामार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाले

Exit mobile version