| पनवेल | वार्ताहर |
खारघर उपनगरातील सेक्टर- 8 येथील गुडविल सोसायटीमध्ये हुक्कापार्लर चालविणार्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने तीन जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज्यात हुक्का फ्लेवर बाळगणे तसेच हुक्का ओढण्याचा व्यवसायाला प्रतिबंध असताना सुद्धा खारघर येथील गुडविल सोसायटीमधील गाळा क्रमांक 7ए आणि 8 ए येथे वाईब्स कॅफे या दुकानात हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या कक्षाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ यांच्या पथकाने वाईब्स कॅफे दुकानात शिरुन ही कारवाई केली.