| पनवेल | वार्ताहर |
अकरावीच्या परीक्षेत तीन विषयांत नापास झाल्याने वडील ओरडल्याने एक विद्यार्थी घर सोडून गेला. हा विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलीस संबंधित विद्यार्थ्याच्या शोध घेत आहेत. खारघर उपनगरातील सेक्टर -18 येथील श्रीजी सोसायटीमध्ये हा विद्यार्थी राहतो. अकरावीच्या परीक्षेत तो नापास झाला होता. त्याला वडील ओरडले. त्यानंतर तो रात्री दीड वाजताच्या सुमारास घर सोडून निघून गेला. सर्वत्र शोधाशोध केल्यावर त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना दिली.