| चणेरा | वार्ताहर |
रोह्यातील श्रीराम लॉजवर सुरु असलेल्या अनैतित व्यवसायावरुन नागरिक आक्रमक झाल आहेत. लॉजची चौकशी करण्यात यावी, परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत रविवारी तीव्र निषेध नोंदवला आहे.
नाक्यावर श्रीराम लॉजच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी ग्रामस्थांनी घोषणा दिल्या त्यानंतर महिला मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, काशिनाथ धाटावकर, समाधान शिंदे, मनोहर धाटावकर, भूपेंद्र धाटावकर, विलास पालवणकर, अशोक धाटावकर, अशोक माने, गणेश बारणेकर, सुर्यकांत कोलाटकर, गिरीश घोसाळकर,सुधीर घोसाळकर, पांडुरंग धाटावकर आदी उपस्थित होते.