अनेकांना त्रास, वनखात्याचे दुर्लक्ष
। सुतारवाडी । वार्ताहर ।
जून महिन्यापासून जंगली माकडे विळे परिसरात संचार करत असून सुरुवातीला ते कोणाला त्रास देत नसत. त्यामुळे अनेकजण माकडाला काही ना काही खायला देत होते. आता मात्र दुकानांवर उड्या मारुन कधी फळे खातात तर कधी भाजीची नासधुस, कधी हॉटेलच्या काउंटरवरील सामानाची नासधूस करण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. माकड दिसला कि अनेकजण घाबरून पळ काढतात. जर कोणाला दुखापत केली तर मोठा अनर्थ ओढावण्याची शक्यता आहे. याबाबत वनखात्याने दखल घेवून या माकडाचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. याबाबत वनखात्याने त्वरीत दखल घ्यावी, असे आवाहन परिसरातील नागरिकांनी केले आहे.