| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील लेडीज बार बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय पँथर सेनेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष रोशन भाऊ मोरे यांनी केली. श्री. मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी खालापूर डीवायसपी संजय सुक्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर असलेले लेडिज बार रात्री उशिरापर्यंत चालू असल्यामुळे घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथला जो तरुण वर्ग आहे, तो या बारच्या नादी लागून स्वतःचा आयुष्य बरबाद करत आहे. लेडीज बार बंद न झाल्यास राष्ट्रीय पँथर सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशील जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष रोशन मोरे, कोमल शहा, मीरा वहर, प्रवीण ननावरे, रोहित पवार, अॅड.सिद्धार्थ जाधव, चेतन दलवी, उत्तम शिंदे, सागर केदारी, आशिष खंडागळे, नागेश कांबळे, ओमकार साखरे, अमित केदारी आदी उपस्थित होते.