। अबुधाबी । वृत्तसंस्था ।
अरब क्लब अजिंक्यपदाचा अंतिम सामना किंग फहद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अल नासरने क्लब अजिंक्यपद चषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात अल नासरने ख्रिस्तियानो रोनाल्डोसह 9 खेळाडूंसह खेळून अतिरिक्त वेळेत अल-हिलाल विरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अल-नासरचे दोन्ही गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले.
ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी प्रो लीगमध्ये गेल्या मोसमात ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्याचा संघ उपविजेता ठरला. मात्र, यंदा 38 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्पर्धेत 6 गोल केले. त्याने आपला हंगाम सर्वाधिक गोल करणारा म्हणून पूर्ण केला. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो सोनेरी बुटाचा मानकरी ठरला. अरब क्लब अजिंक्यपद चषक ही स्पर्धा अरब प्रदेशातील शीर्ष क्लब संघांमध्ये खेळवली जाते. त्यात सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, इराक, मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जेरिया या संघांचा समावेश आहे. पूर्वार्धात अल-नासरच्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु अल हिलालचा गोलरक्षक मोहम्मद अलोव्हाइसने सॅडिओ माने, सेकोउ फोफाना आणि मार्सेलो ब्रोझोविकचे प्रयत्न अपयशी ठरवले.
सॅडिओ माने, सेकोउ फोफाना आणि मार्सेलो ब्रोझोविक हे अल नासरमध्ये नवीन जोडले गेलेले खेळाडू आहेत. उत्तरार्धात 6 मिनिटेही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर अल-हिलालच्या माल्कमने सहकारी ब्राझीलच्या मायकेलकडे चेंडू पास केला. मायकेलने फ्री हेडरने चेंडू गोलपोस्टवर नेला. यासह अल-हिलाल संघाने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.