। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील धुतूम ते एकटघर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वैजनाथ ठाकूर, मच्छिंद्र ठाकूर, दिलीप मुंबईकर, विश्वास पाटील, एकनाथ घरत, रमेश पाटील, एस.के.ठाकूर, अरुण ठाकूर, सुरज ठाकूर, निशांत ठाकूर, रिक्षाचालक संघटनेचे सदस्य, यार्डचे मॅनेजर आदी उपस्थित होते.
या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याबाबत जि. प. सदस्या कुंदा ठाकूर, माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी तक्रार केली होती. तसेच पत्रकारांनी वृत्त प्रसिद्ध केल्याने काम रखडले होते. सध्या या रस्त्याचे काम ठेकेदार ज्ञानप्रकाश पाटील यांनी घेतले . हे काम दुसर्याच्या नावावर असून प्रत्यक्षात काम ज्ञानप्रकाश पाटील करीत आहेत.