कॅस्ट्रॉल प्रिमियर लीगचा सीआरबी संघ विजेता

| खोपोली | वार्ताहर |

रसायणीतील पिल्लई मैदानावर रंगलेल्या कॅस्ट्रॉल प्रीमियर लीग 2023 चा सीआरबी संघ विजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात मॅग्नेटिक संघावर बावीस धावांनी विजय मिळवत सीआरबी संघाने विजेती पदाची ट्रॉफी उंचावली.

दैनंदिन व्यापातून खेळाच्या मैदानाकडे वळण्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होऊन ऊर्जा मिळावी यासाठी कॅस्ट्रॉल प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चार संघाने सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात सीआरबी संघासमोर मॅग्नेटिक संघ टिकाव धरू शकला नाही. सहा षटकाच्या सामन्यात सीआरबी संघाने बनवलेल्या 82 धावांचे आव्हान पेलताना मॅग्नेटिक संघ केवळ 60 धावा करू शकला. सीआरबी संघाच्या विजयात मोलाचा वाटा विजय सकपाळ यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने उचलला. सकपाळ यांना मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कल्पेश काशिनाथ पाटील याची निवड करण्यात आली. विजेता संघाला चषक आणि मेडल देवून गौरवण्यात आले.मॅग्नेटिक संघाला उपविजेतेपदाचा चषक देऊन गौरवण्यात आले.

कॅस्ट्रॉल प्रीमियर लीग चे यशस्वी आयोजन करण्यासाठी कॅस्ट्रॉलचे अधिकारी सुनील टेंबे, राजेश बरेरा नरेंद्र डोके, दिलीप मोकल यांच्यासह अनेकानी प्रचंड मेहनत घेतली.

Exit mobile version