| उरण | वार्ताहर |
शिवसेना शाखा जसखार यांच्या वतीने प्रकाश झोतातील भव्य ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला रसिक प्रेषक, नागरिक, ग्रामस्थांचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक मंगल मूर्ती दारावे क्रिकेट संघ, दुसरा श्री दत्त भातान क्रिकेट संघ तिसरा रायगड एक्स्प्रेस सुधीर तांडेल व धीरज म्हात्रे क्रिकेट संघ जसखार यांनी पटकविला.

शिवसेना शाखा जसखार आयोजित धर्मवीर चषक 2023 चे उदघाटन रुपेश पाटील शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा संपर्क प्रमुख रायगड, परेश पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना, अतुल भगत उपजिल्हा प्रमुख, सुरेश म्हात्रे कामगार नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रणाली म्हात्रे, सदस्या हेमलता ठाकूर, वैजयंती ठाकूर, धनवंती ठाकूर, दमयंती म्हात्रे, सीमा ठाकूर, गणेश घरत, नितीन पाटील, निल पांडे, रवि पाटील, हितेंद्र ठाकूर, हेमंत भोईर, रमाकांत पाटील, अमित ठाकूर, हर्षल ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, मनिष म्हात्रे, रणजित पाटील उपस्थित होते.