। उरण । वार्ताहर ।
नागावमधील शेकापचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अनंत घरत आणि मित्र मंडळ, म्हातवली-नागाव उरण यांच्यातर्फे कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, नेरे, पनवेल येथे जीवनावश्यक धान्याचे वाटप केले. त्यामध्ये तांदूळ 100 किलो, कांदे 50 किलो, बटाटे 50 किलो, तेल 5 किलो, मुगडाळ 5 किलो, हिरवे वाटाणे 5 किलो इत्यादींचा समावेश आहे.
याप्रसंगी म्हातवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य अनंत घरत, माजी उपसरपंच भूषण पाटील, पी.एच. घरत, पराग ठाकूर, प्रकाश पुरो, विलास पाटील, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर हे आवर्जून उपस्थित राहून त्यांनी सर्वांना कुष्ठरोग निवारण समितीच्या कार्याची माहिती दिली.