। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील कारावी गावचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गजानन मोकल यांनी आपला नातू भाग्य (शंभु) संदेश मोकल याचा वाढदिवस चाईल्ड हेवन वसतिगृहातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी वस्तुचे वाटप करुन साजरा केला.
समाजातील गरीब गरजू मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. आपण त्यांना या कामात थोडीफार मदत करावी या उद्देशाने गजानन मोकल यांच्या कुंटुबाने निर्णय घेऊन आपला नातू भाग्य मोकल याच्या वाढदिवसानिमित्त चाईल्ड हेवन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा केला. यावेळी गजानन मोकल, वत्सला मोकल, संदेश मोकल, सुप्रिया पाटील, सचिन पाटील आदींसह वसतिगृहातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.