| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील (विशेषतः खोपोली/कर्जत/खालापूर भागातील) सर्व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, प्रसारमाध्यमांमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या पुणे जिल्ह्यातील धरणांच्या आोव्हरफ्लो बाबत ज्या सूचना प्रसारित करण्यात येत आहेत, त्या बातम्या पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी परिसरातील नागरिकांकरिता लागू आहेत. वर नमूद सर्व धरणांच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येतो. रायगड जिल्ह्यात या धरणांच्या सांडव्यावरून कोणत्याही स्वरूपात विसर्ग सोडण्यात येत नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी पारित केल्या जाणाऱ्या सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेऊन त्यांचे पालन करावे.