| पनवेल | वार्ताहर |
नादुरुस्त टेम्पोच्या खाली टायर बदली करण्यासाठी गेलेला चालक टेम्पोच्या टायर खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर कळंबोली जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव टेम्पो, रस्त्यावर नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या टेम्पोवर धडकल्याने झालेल्या, अपघातात नादुरुस्त टेम्पोच्या खाली टायर बदली करण्यासाठी गेलेला चालक टेम्पोच्या टायर खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर कळंबोली जवळ घडली. या अपघातात टेम्पोला धडक देणारा टेम्पो चालक देखील जखमी झाला असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.