| उरण | वार्ताहर |
उरण – मोरा बंदर रस्त्यावरील विद्युत वाहक पोल उरण नगर पालिका व महावितरण विभागाने न हटविल्याने सदर रस्त्यावरून प्रवास करणार्या मोटारसायकल स्वार, रिक्षा तसेच इतर वाहनांना अपघातास कारणीभूत ठरु पाहत आहेत. तरी अपघाताला व वाहन प्रवासी नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण करु पाहणारे सदर रस्त्यावरील विद्युत वाहक पोल हटविण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयवंत कोळी यांनी केली आहे.
नगर पालिकेने उरण शहर ते मोरा बंदर या रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व काँक्रीटकरण करण्याचे काम मागील एक वर्षापासून हाती घेतले आहे.परंतु सदर रस्त्यावर असणारे विद्युत वाहक उरण नगर पालिका व महावितरण विभागाच्या अधिकार्यांनी न हटविल्याने सदर विद्युत वाहक पोल हे रात्री अपरात्री प्रवास करणार्या मोटारसायकल स्वार,रिक्षा व इतर वाहनांना अपघातास कारणीभूत ठरु पाहत आहेत.सदर रस्त्यावरील विद्युत वाहक पोल न हटविल्यास रात्री अपरात्री रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून अपघातामुळे जीवितहानी ही संभव आहे .तरी उरण नगर पालिका व महावितरण विभागाच्या अधिकार्यांनी अपघाताला कारणीभूत ठरु पाहणारे विद्युत वाहक पोल हटविण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयवंत कोळी यांच्या कडून करण्यात येत आहे.
उरण – मोरा बंदर रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व काँक्रीटकरण करण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे. उरण नगर पालिका महावितरण विभागाच्या माध्यमातून लवकरच लवकर सदर रस्त्यावरील विद्युत वाहक पोल हटविण्यात येणार आहेत. – राहुल इंगोले – मुख्याधिकारी