| वाघ्रण | वार्ताहर |
शिक्षक पतपेढी अलिबागच्या पंचवार्षिक निवडणुक 2022-23 ते 2027-28 च्या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलतर्फे 18 जागांसाठी पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी पॅनलप्रमुख सोपान चांदे, चेअरमन प्रसाद म्हात्रे, विनोद कडव,सतिश हुले, रोशन तांडेल, अजय कापसे, विनोद जोशी, वाय.एस. पाटील,दीपक पाटील,हितेंद्र म्हात्रे,.विठोबा पाटील,आनंद मोहिते, सुनील बलकवडे, मतीन सुभेदार, निलेश तुरे,शंकर गायकवाड अनिल सारंगे, सीताराम जाधव ,संजय घाडगे ,दीपक जाधव ,दिपाली करंबे,तसेच उमेदवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पतपेढीचे हित व आपला पैसा सुरक्षित रहावा यासाठी अलिबाग पतपेढी च्या सर्व सभासदांनी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवाराना भरघोस मते देऊन निवडून द्यावे, असे आवाहन परिवर्तन पॅनल प्रमुखांनी केले आहे.चांदे यांनी आभार मानले.