पंडित पाटील यांना विश्वास
| आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असून एक नवीन बदल घडवून आणून येथील लोकांनी परिवर्तन पॅनलला बहुमत दिले आहे. परिवर्तन पॅनलकडून निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करुन आगामी काळात निवडून आलेले सर्व संचालक सुपारी पीक वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवून पीक वाढवण्यावर निश्चित भर देतील असा विश्वास माजी आ. पंडित पाटील यांनी व्यक्तकेला. यावेळी ते म्हणाले कि, सुपारी पीक वाढवण्यासाठी शेतकर्यांना विविध प्रशिक्षण देण्यासाठी अथवा विशेष सेमिनार सुद्धा सुपारी संघामार्फत आयोजित केले जातील. तसेच उजाड जमीन वापरात आणून तिथे सुद्धा सुपारी लागवड करण्यासाठी नवीन संचालक मंडळ कार्यतत्पर असणार आहे. सुपारी पिकाला जास्तीतीत जास्त भाव मिळावा व बागायतदाराना दिलासा देण्यासाठी हे संचालक मंडळ निश्चित प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पाटील यांच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले तीन संचालक प्रवीण चौलकर, विकास दिवेकर व नरेश पाटील यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, माजी नगरसेविका प्रीता चौलकर, राजेश दिवेकर, अमोल पाटील, जयंत कासार, संदीप गोणभरे आदी मान्यवर उपस्थित होते.