सोमवारी अलिबागेत प्रारंभ; चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रायगडातील युवक, युवतींसाठी भव्य रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत. पहिला मेळावा सोमवारी 10 एप्रिलला अलिबाग येथे होणार आहे.
अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी (10 एप्रिल) सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मंगळवारी दि.11 एप्रिल रोजी मुरुड येथील व्ही.एन. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10 ते 4, तर रोहा येथील सानेगाव हायस्कूलच्या प्रांगणात बुधवारी (12 एप्रिल) सकाळी 10 ते 4 या कालावधीत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तीन दिवस सुरु राहणार्या या रोजगार मेळाव्यात नर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅॅलिटी, फॅसिलीटी, सिक्युरिटी, टेलिकॉम व इतर, आयटी, बीपीओ, केपीओ, फार्मा, पत्रकार आदी क्षेत्रातील इच्छुकांना या मेळाव्यात फायदा होणार आहे. यासाठी इयता आठवी ते दहावी, बारावी, बीए, एमए, बीकॉम, एमकॉम, बी.एस्सी, एम.एस्सी, बीसीए, एमसीए, बीबीए, एमबीए, आयटीआय, बीई (सर्व विभाग) डिप्लोमा, पत्रकार, पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. नामवंत कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून, युवक, युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.