| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील देहेन येथे बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या पंधरा दिवसीय शिबिरामध्ये सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी मार्फत बासरी रंग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिन धुमाळ यांनी बासरीवर राग यमन सादर केला. त्यानंतर सर्व विद्याथ्यांनी विविध भक्तीगीते सादर केली. मानस धुमाळ याने ‘देहाची तिजोरी’, सूर्यकांत पाटील यांनी ‘रुणूझुणु रुणूझुणु रे भ्रमरा’, जान्हवी धुमाळ हिने देशप्रेमावरील ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’ अशी विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी जयेंद्र पाटील, शार्दूल भगत, श्रीगणेश म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कीर्तनकार अमित म्हात्रे, उमेश शिंदे आणि देहेन येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी केले होते.