। कोलाड । वार्ताहर ।
तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट प्रसंचालित डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे-कोलाड संस्थेचे ट्रस्टी संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.1) तृतीय वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारभ संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख, नेहल प्रधान, अमोल गोलीपकारव प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. तसेच, डॉ. विश्वास देशमुखी यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात सत्य, जिद्द, चिकाटी व प्रामाणिकता जवळ असेल तर यश संपादनासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत जो टिकेल तोच खरा यशस्वी होईल, तरी या पुढे खूप काही शिकण्यासारखे आहे. खूप शिका मोठे व्हा, आई-वडिलांसोबत गुरूंचेही नाव मोठे करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.