जयराम सहकारी सोसायटीत आक्रमक पवित्र्यात
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दमखाडी नाक्यावर असणाऱ्या श्रीराम लॉजवर पोलिसांनी धाड टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये आरोपीसह तीन महिलांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, लॉज मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जयराम सहकारी सोसायटीच्या रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
श्रीराम लॉजच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन जयराम सोसायटीतील नागरिकांनी मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली. यासंबंधीचे निवेदन रोहा पोलीस आणि तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी जयराम सहकारी सोसायटीच्या रहिवासी व सर्व पदाधिकारी यांनी श्रीराम लॉजवर चालणाऱ्या अनैतिक गैरप्रकाराना कायमस्वरुपी मुळासकट नायनाट करुन उखडून टाकावे, पुन्हा अशा रोहा तालुक्यात प्रकार घडू नये, असे मत जयराम सहकरी सस्था अध्यक्ष दिपिका चिपळूणकर, सचिव मधुकर वाघमारे, खजिनदार सचिन जाधव, मनोहर पाटील, मनोहर जैन, प्रकाश चौधरी, मधुकर वाघमारे, अजित कोलबे, सागर जाधव, अथर्व रोहेकर, प्रतिश पानसारे, निवास तळकर, सरोज जाधव, राजश्री पवार, सुजया यादव, रचना पवार, वर्षा पाडये, नितीन प्रधान, मृदूळा प्रधान, अंकिता कोलबे, सुजाता पाटील, रेखा चौधरी, कोमल जैन, तनुजा मनोरे, प्रमोद शिदे, साक्षी पाटील, हर्षदा पवार, विद्या रोहेकर व तसेच सोसायटीतील नागरिक निवेदन देताना उपस्थित होते.