| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचालित प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेला मंगळवारी (दि.21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आग दुर्घतेनेत लाखो रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
रोहे शहारातील मतीमंद मुलांच्या शाळेला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी शाळेच्या कौलांमधून धूर येत असल्याचे प्रीतम देशमुख यांच्या निदर्शनास आले. रात्रीची वेळ असल्याने शाळेला कुलूप होते. प्रीतम देशमुख यांनी तत्परतेने संस्थेच्या अध्यक्षा दर्शना आठवले आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख नितीन वारंगे यांना आग लागल्याची माहिती दिली. तसेच, शाळेचे कुलूप तोडून अंधारआळी व धनगर आळीतील युवकांना सोबत घेऊन मदतकार्य सुरू केले. तालुका प्रमुख नितीन वारंगे यांनी पुढील दहा मिनिटांत एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठविले. या आगीत शाळेचे कॉम्प्युटर, फर्निचर, सीसीटिव्ही, वायफाय सिस्टीम, कपाटातील स्टेशनरी व खेळांचे साहित्य जळून खाक झाले.







