| पनवेल | प्रतिनिधी |
नेरे ग्रामपंचायत हद्दीतील मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मोफत लाकडे देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. नेरे ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब दुःखात असते. यावेळी गावातील एखाद्या व्यक्तीला लाकडे आणि अन्य सामान आणण्याची जबाबदारी दिली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकडे विकत टेम्पोमधून आणावी लागतात. याबाबत नेरे ग्रामपंचायतने एक पाऊल पुढे टाकत दीड वर्षांपूर्वी अंत्यविधी करण्यासाठी लागणारे सामान मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर (दि.29) ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे देखील मोफत देण्याचा निर्णय सरपंच प्रकाश घाडगे, राम पाटील, राजश्री पाटील यांनी घेतला आहे. शैलेश जाधव, तन्वी ठाकूर, सविता चोरघे, दिनेश मानकामे, कल्पना वाघे, नीलिमा पाटील, शैलेश पाटील, मनीषा गायकर, प्रगती फडके, वंदना रोडपालकर यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.







