| पनवेल | वार्ताहर |
सायन पनवेल महामार्ग कोपरा ब्रिज खाली प्रवीण बाविस्कर यांनी फुटपाथवर एक अनोळखी व्यक्ती नीपचीत पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती खारघर पोलिसांना दिली. या अनोळखी व्यक्तीला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 35 वर्ष असून, रंग गोरा, उंची 5 फूट, मध्यम बांधा, केस काळे, दाढी वाढलेली, नाक सरळ, चेहरा गोल, अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सदर मृत व्यक्तीसंबंधी अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरी. रत्ना खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधावा.







