आ. जयंत पाटील यांची सभागृहात मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अकोल्यातील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने कामगारांचा इन्शुरन्स उचलला होता का? असा प्रश्न शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. आणि इन्शुरन्स उचलला नसल्यास तो का उचलला नाही? असाही प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यासर्व विषयांवर कारवाई करून कामगारांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राज्य शासनकडे केली.
हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सत्रामध्ये आमदार जयंत पाटील यांनी अकोल्यातील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत संबंधित कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विशेषकरून राज्यामध्ये काम करत असलेल्या कामगारांना न्याय देण्याची जबाबदारी कामगार खात्याची असल्याचे नमूद केले. यामुळे हा विषय केवळ संबंधित कंपनीपर्यंत मर्यादित नसून तो राज्य शासनाच्या खात्यातील अधिकार्यांशीही तितकाच संबंधित आहे असे ठाम मत व्यक्त केले. यामध्ये अनेक अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी आहेत असे सांगत आपली जबाबदारी इतरांवर ढकलण्याचे काम सातत्याने करत असतात आणि वाटेल तेवढा पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात. याच अनुषंगाने संबंधित कंपनीने कामगारांचा इन्शुरन्स उचलला होता का? असा प्रश्न आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला. आणि इन्शुरन्स उचलला नसल्यास तो का उचलला नाही? असाही प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यासर्व विषयांवर कारवाई करून कामगारांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राज्य शासनकडे केली.