| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा येथील वासांबे आई महिला बचत गटाकडून ग्रामसंघाच्या महिलांकरिता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सरपंच उमाताई मुंढे, वर्षा पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा राऊत, सीआरपी उज्वला शेंडकर यांच्यासह परिसरातील बचत गटांच्या महिला हळदीकुंकू समारंभात उपस्थित होत्या.
यावेळी वासांबे आई महिला बचत गटाच्या महिलांनी पारंपरिक गाण्यांवर ताल धरला. वासांबे आई महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे यांनी उपस्थित मान्यवर महिलांचे पुष्पगुच्छ देऊन बचत गटाच्या वतीने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा रसिका खराडे, उपाध्यक्ष सुष्मिता अहिर, सचिव रेखा पवार, खजिनदार रुपाली अहिर, रंजना पाटील, नाजुका खराडे, सुप्रिया अहिर, दिपिका अहिर, वंदना जोडे, नम्रता खेत्री, मंजुला खराडे आदी उपस्थित होते.