| कोलंबो | वृत्तसंस्था |
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलंबोत पावसाची मोठी शक्यता असतानाही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ‘सुपर फोर’चे सामने येथेच खेळवण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. आता त्याला हवामान खात्याचा दिलासा मिळाला आहे.
9 सप्टेंबरपासून कोलंबोतील हवामान क्रिकेटसाठी उपयुक्त असेल, असे श्रीलंका हवामान खात्याचे सरसंचालक अतुला करुनानायके यांनी सांगितले आहे. बरोबर याच तारखेपासून कोलंबोतील सामने सुरू होत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 तारखेला भारत-पाक सामना होणार आहे. त्यानंतर 12, 14, 15 तारखेलाही सामने असून अंतिम लढत 17 सप्टेंबरला नियोजित आहे.