| रेवदंडा । वार्ताहर ।
निसर्गाच्या किमयेतून निर्माण झालेल्या कारंजाने स्नानगृहाचा आस्वाद एक वेगळीच पर्वणी असेल, इतिहासात चौल मधील हमामखान्यात (स्नानगृह) कारंजाचा स्नानासाठी कांरजाच्या पाण्याचा उपयोग केला जात असलेला हमामखाना दुरावस्थेत पहावयास मिळतो.
चौल काटकर आळी नजीक ऐतिहासिक हमामखाना आढळते. या प्रांताधिकाराच्या मुख्यतः कार्यालय असल्याने या परिसरात प्राचीन काळात मुघल सरदाराची रेलचेल मोठी असणार, त्यांचे निवासस्थानासह शाही हमामखाना येथे तैनात असावा. चौल मधील इतिहासाचे साक्षीदार असलेला हमामखानात कारंजाचे पाणी दिले जात असावे, असे या हमामखानाच्या बांधकामावरून म्हटले जाते.
चौलमधील मुघलकाळीन हमामखाना चौल काटकर आळी नजीक आहे. हमामखान्याच्या उत्तरेकडील भिंतीत काही उंचीचा सहा ओवर्या आहेत. पुर्वेकडील बाजूच्या दोन कमानीतून प्रमुख चौकोनी दालतान प्रवेश करता येतो. येथील अवशेष पडझड झाली असली तरी अजून उभे आहेत. प्रमुख चौकोनी दालनातील अंदाजे साडे नऊ मीटर उंचीवरील घुमट पडलेला आहे. दालनाच्या मध्यभागी अष्टकोनी कांरजे असावे, असे येथील बांधकामावरून दिसते. दालनाच्या उत्तर, दक्षिण, व पुर्व बाजूच्या भिंतीत कमानीयुक्त बैठकीची सोय आहे. दालनाच्या वायव्य कोपर्यातील वळणाच्या अरूंद वाटेने आत गेल्यावर उत्तर बाजूस मोठे आकाराची स्नानगृहे आहेत.
सध्यस्थितीत हमामखाना पुर्णतः उनाड झाडीझुडपाने वेढलेला आहे. ऐतिहासिक शाही हमामखाना इतिहासप्रेमी व पर्यटक यांना पहाण्यासारखा आहे. हा हमामखाना इतिहासकालीन बांधकामाचे उत्कृष्ट नमुना आहे. मात्र पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेने दिवसेंदिवस हमाम खान्याची वास्तूची अधिकाअधिक दुरावस्ता होत आहे.