। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिसमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा होत आहेत. भारत यंदा 84 खेळाडूंसह सर्वात मोठा दल पॅरिसमध्ये पाठवणार आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या 14 महिलांसह एकूण 54 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदा 32 महिला खेळाडूंसह एकूण 84 जण सहभागी होत आहेत.
या स्पर्धेत भारतीय दलाच्या ध्वजवाहकाचा मान महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव यांच्यासह भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मिळाला आहे. 1985 मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे भाग्यश्रीचा जन्म. 2006 मध्ये एका अपघाताने तिला व्हिलचेअरवर बसवले आणि ती प्रचंड मानसिक दडपणात गेली होती. पण, तिने गोळाफेकीचा खेळ निवडला आणि डिप्रेशनवर मात केली. 2022च्या आशियाई पॅरा स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले.