जिल्हा शिंपी समाजातर्फे गुणवंतांचा सन्मान

। तळा । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघ व इंदापूर नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी तसेच उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत नामदेव महाराज आणि श्री दत्त मंदिर उद्घाटन सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, प्रभावती फुटाणे, समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, संजय आप्पा ढवळे, द्वारकानाथ ढवळे, मेघनात सातपुते, अनंत टमके, जयकिरण बारटक्के, अरुण करंबे, कार्याध्यक्ष दत्तात्रेय पांढरकामे, मनिषा शिंत्रे, प्रेषित बारटक्के, कीर्तिकुमार कळस, हेमंत बारटक्के, मीनल ढवळे, सचिन ढवळे, दिलीप मेकडे, श्रीकांत कटारे, दिलीप करंबे, चंद्रकांत रोडे, मकरंद बारटक्के आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्याध्यक्ष दत्तात्रेय पांढरकामे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version