। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.1 मधील नगरसेवक विष्णू जोशी व प्रभाग क्र.1 मधील नगरसेवकांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पडघे गावात विविध विकासकामे होत आहे. या विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
पडघे हनुमान मंदिर ते एमआयडीली पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण, राधा कृष्णा मंदिर ते सिडको नाल्यापर्यंत बांधण्यात येणार्या गटाराचे भूमिपूजन, नगरसेवक विष्णू जोशी यांच्या नगरसेवक निधीतून लावलेल्या पेव्हर ब्लॉकचे लोकार्पण, पडघे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून शाळेसमोर बसविण्यात येणार्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उदघाटन, बौद्ध समाज मंदिराचे भूमिपूजन, नगरसेवक विष्णू जोशी यांच्या नगरसेवक निधीतून पडघे गावात ठीकठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे उदघाटन या विविध विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन पार पडले. यावेळी आ. बाळाराम पाटील, पनवेल पं.स माजी सभापती काशिनाथ पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, जिल्हा चिटणीस गणेश कडू, विष्णू जोशी, किरण दाभणे, पांडूशेठ भोईर, अनंत भोईरे, सूर्यकांत जोशी, वसंत भोईर, गणपत जोशी, नाथा पाटील, सुरेश भोईरे, हिरामण भोईर, प्रभाकर पाटील, चंद्रकांत भोईर, अशोक भोईर, शंकर जोशी ,जगदीश जोशी, सचिन पाटीर्ल, बबन भोईर्र, मिन्नाथ जोशी, नकुल जोशी, राहुल भोईर्र, अमित कांबळे, राहुल कांबळे तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.