| पनवेल | प्रतिनिधी |
चोरट्याने कळंबोलीत घरफोडी करत सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
गौरव बेलोटे सेक्टर 3 इ. कळंबोली येथे राहत असून, ते सर्वजण कामावर गेले असता दुपारी यांच्या मुलाला ताप आल्याने ते त्याला दवाखान्यात घेऊन गेले. सर्वजण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दवाखान्यातून घरी आले असता घराचा लोखंडी दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. चोराने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.