। उरण । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन झोन-1च्या अॅथलिटिक्स स्पर्धा 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मरीन लाइन्स येथील मुंबई विद्यापीठ क्रीडांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत के.एम.सी. महाविद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपन्न केले आहे.
या स्पर्धेत साहिल विचारे, प्रणव सावंत, सुजल घरत, विकास थिकडे, तुषार मेठल, साहिल धायगुडे यांनी 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. पूर्वा जाधव, मुस्कान खान, साक्षी गुप्ता, शर्वरी शेवाळे, साक्षी गुप्ता, पायल पटेल यांनी 400 मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. तर, साहिल विचारे, सुजल मेठल, प्रणव सावंत, मुस्कान खान, पूर्वा जाधव यांनी 100 मीटर मिश्र रिले स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले आहे. तसेच, वैयक्तिक स्पर्धेत गौरव गुरुमकर याने उंचउडीत कांस्यपदक, पूर्वा जाधवने 800 मीटर धावणेत रौप्यपदक व 400 मीटर धावणेत कांस्यपदक, ईशा देशमुखने 10 किलोमिटर धावण्यात रौप्यपदक, गार्गी मसुरकरने थाळीफेकमध्ये कांस्यपदक प्राप्त केले आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक डॉ. जयवंत माने, अक्षय कदम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांसह सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, या विद्यार्थ्यांचे केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी भेटवस्तू देऊन विशेष अभिनंदन केले.