। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दापोली मंडणगड या दोन तालूक्यांना जोडणार्या दापोली मंडणगड मार्गावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निमार्ण झाले असून वाहतुकीला अडथळा निमार्ण होत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी सावर्जनिक बांधकाम विभाग या महत्वाच्या समस्येकडे कानाडोळा करताना दिसत आहे.
दापोली मंडणगड मुंबई मागार्वर दापोली ते मंडणगड दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता पार उखडून गेला असल्याने वाहतुकीची मोठीच समस्या निमार्ण झाली आहे. असे असले तरी सावर्जनिक बांधकाम विभागाचे मात्र या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दापोली मंडणगड हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग असून या मागार्वर खाजगी तसेच एस.टी.महामंडळाच्या बसेसची कायम वदर्ळ असते. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहीलेला नसल्याने तिथे अपघाताचे प्रमाण खुपच वाढलेले आहे. पुढे येणारा गौरी गणपतीचा सण आणि त्यासाठी चाकरमान्यांचे शहराकडून ग्रामीण भागाकडे होणारे आगमन हे सुकर होण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याची तजविज केली नाही तर ऐन गणेशोत्सवात वाहतुक कोंडीची मोठीच समस्या निमार्ण होवून त्याचा फटका या मागार्वरून प्रवास करणार्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे.