| नागोठणे | वार्ताहर |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व संस्थेच्या प्राचार्य, सौ विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्रमसंस्कार शिबीर नुकतेच नागोठण्याजवळील ग्रामपंचायत वांगणी येथे दिनांक 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या श्रमसंस्कार शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून विविध कामे केल्याने हे शिबीर आगळ्या वेगळ्या पध्दतीने संपन्न झाले.
या श्रम संस्कार शिबिरात नागोठणे औ.प्र.संस्थेच्या राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे 25 स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी एन.जे. वारे हे सहभागी झाले होते. या श्रमसंस्कार शिबिरात रा.जि.प शाळा वांगणी व राजिप शाळा आमडोशीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच सुतारकाम या व्यवसायाच्या सहकार्याने शाळेतील मोडलेल्या खिडक्या व दरवाजे दुरुस्त करून देण्यात आले. त्याचबरोबर शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. प्लंबर व्यवसायाच्या माध्यमातून आमडोशी शाळेच्या आवारात दीडशे फूट लांबीची पाईप लाईन टाकून देण्यात आली. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन व्यवसायाच्या माध्यमातून शाळेतील तुटलेले इलेक्ट्रिकचे बोर्ड दुरुस्त करून व नवीन कनेक्शन करून देण्यात आले. वांगणी ग्रामपंचायत परिसरात असलेली स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली व स्मशानभूमी लगत असलेल्या शंकराच्या मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या श्रम संस्कार शिबिरास सोनम भोसले, एकनाथ ठाकूर, एन. डब्ल्यू पाटील, पी. पी पाटील, एस. ए .वावळ, एस .डी .बाईत, पी.पी वाघ, ए. ए. खरजे, आय.एम.सी. पी व्ही. आय. लोंढे, पी. आर .पाटील, विद्या बाक्कर, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी व पहारेकरी यांचे सहकार्य लाभले.